10 वर्षांखालील मुलांना देखील होऊ शकतो कर्करोग, 'या' लक्षणांवरून ओळखा

Jul 15,2024

बालरोग कर्करोग

बालपणातील कर्करोग हा मुलांमध्ये आढळणारा एक अतिशय गंभीर आजार आहे.

रिपोर्टनुसार

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार दरवर्षी सुमारे ४ लाख मुले या गंभीर आजाराला बळी पडतात.

ल्युकेमिया कर्करोग

ल्युकेमिया हा मुलांमधील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. यामध्ये रुग्णाला सतत थकवा, वजन कमी होणे आणि रक्तस्त्राव यांचा समावेश असतो.

न्यूरोब्लास्टोमा

हे प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळते, यामुळे पोटदुखी, श्वास घेण्यात अडचण यांसारख्या समस्या होतात.

ब्रेन ट्यूमर

ब्रेन ट्यूमरला 'सेंट्रल नर्वस सिस्टम ट्यूमर' असेही म्हणतात. मुलांमध्ये हा दुसरा सामान्य कर्करोग आहे. यामध्ये मुलांना फेफरे येणे, डोकेदुखी आणि डोळा मिचकवणे अश्या समस्या होतात.

लिम्फोमा

लिम्फोमा कर्करोग हा लहान मुलांना होऊ शकतो. यामध्ये मुलांना रात्री घाम येणे, वजन कमी होणे, थकवा येणे अशा समस्या होऊ शकतात

विल्म्स ट्यूमर

हे प्रामुख्याने 3-4 वर्षांच्या मुलांमध्ये होते. हा एक प्रकारचा मूत्रपिंडाचा कर्करोग आहे. या आजारात पोटाच्या खालच्या भागात गाठ तयार होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story