कोलेस्ट्रॉल हा लीव्हरमध्ये तयार होणाऱ्या चरबीचा प्रकार असून, हा रक्तात आढळतो. त्याबरोबर हा पेशी, विटॅमिन्स आणि हार्मोन तयार करतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदय रोग, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि नसांच्या रोगाचा धोका वाढू शकतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याची लक्षणं सहज दिसून येत नाही. बरेच लोक याची ओळख लिपिड प्रोफाइल टेस्टद्वारे करतात.
पाय, डोळे आणि जीभ या अवयवांतून शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं दिसून येतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीराच्या काही अवयवांत दुखायला सूरुवात होते.
काही अंतरावर चालल्यास स्नायू दुखनं, थकवा आणि हिसका लागणं ही सर्व हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं आहेत.
जीभेच्या पृष्ठभगावरील अडथळे मोठे होउन केसाळ होतात. त्यांचा रंग काळसर होतो. हेदेखील हाय कोलेस्ट्रॉलचं एक लक्षण आहे.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांमध्ये डाग दिसू लागतात. त्यामुळे डोळ्यांचा प्रकाश कमी होउन डोळे दुखू लागतात.(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)