डोळ्यांच्या संसर्गाला आय फ्लू किंवा कंजक्टीविटिस म्हणतात. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीचे डोळे लाल होतात. यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येत राहते आणि सूज येते. त्यामुळे डोळ्यांना स्पष्ट दिसू शकत नाही.
संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यात पाहून देखील 'डोळे' येतात असे म्हटले जाते. जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला हा संसर्ग होऊ शकतो.
हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढतो. याशिवाय, संक्रमित व्यक्तीच्या खोकला आणि शिंकण्याने देखील संसर्ग पसरू शकतो.
वेळोवेळी हात स्वच्छ करा.सारखा डोळ्यांना स्पर्श करू नका.आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा.वेळोवेळी डोळे धुवा.बाहेर जाणे जास्त महत्त्वाचे असेल तर चष्मा घालून जा. टीव्ही-मोबाइलपासून अंतर ठेवा.
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा. त्यांचा बेड, टॉवेल किंवा कपडे वापरू नका. थोड्या वेळाने डोळे थंड पाण्याने धुवा. याशिवाय गुलाब पाण्याने डोळे धुतल्याने डोळ्यांचा संसर्ग कमी होतो आणि डोळ्यांतील घाण निघून जाते.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित औषध घ्या. टॉवेल, रुमाल यांसारख्या तुमच्या वस्तू कोणाशीही शेअर करू नका. डोळ्यांना संसर्ग झाल्यास चष्मा वापरा, चुकूनही लेन्स घालू नका.
संसर्ग झाल्यानंतर घरीच रहा, बाहेर गेल्यास संसर्गाचा धोका वाढतो.डोळ्यात जळजळ आणि खाज सुटल्यास औषध घ्या.कोणत्याही प्रकारच्या साबणाने चेहरा धुवू नका.
कधीही आपले डोळे हातांनी चोळू नका. बाहेरून आल्यावर आधी हात स्वच्छ करा, मग डोळे स्वच्छ करा. आय ड्रॉप टाकण्यापूर्वीही आपले हात पूर्णपणे स्वच्छ करा.