आज सोशल मीडियाचा वापर करणारे अनेक जणं आहेत.
परंतु याचा दुरूपयोग आणि अतिवापरही अनेकांकडून होतो आहे.
खासकरून तरूणांमध्येही ही सवय वाढू लागली आहे.
समोर आलेल्या अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या जर्नल सायकोलॉजी ऑफ पॉप्युलर मीडिया मधील अभ्यासानुसार १ तासानं जर का सोशल मीडियाचा वेळ कमी केला तर तरूणांना आपली प्रतिमा सुधारण्यास मदत होते आहे.
यावेळी त्यांनी 25 वयोगटापर्यंतच्या मुलांवर प्रयोग केले.
ज्यात 2 तास सोशल मीडियाच्या तरूण वापरकर्त्यांमध्ये नैराश्याची लक्षणे आढळून आली आहेत.
त्यामुळे तरूणांसमोरील सोशल मीडिया हे एक खूप मोठं आव्हान आहे.