पावसाळा सुरू झाला की डेंग्यूचा धोकाही वाढतो.
डेंग्यू हा एक धोकादायक विषाणूजन्य आजार आहे. जो 'इडिस इजिप्ती' डासाच्या चावण्यामुळे पसरतो.
डेंग्यूच्या डासाचा रंग काळा असून त्याच्या पायावर पांढरे पट्टे असतात.
हा डास सहसा घरातील साचलेल्या पाण्यात जसे की बादल्या, ड्रम आणि भांडीमध्ये पैदास होते.
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दोन तास आधी आणि नंतर हे डास बाहेर पडतात.
त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आधी आणि नंतरच्या दोन तासांत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या आणि त्वचेवर लाल चकत्ते यांसारखे लक्षणे डेंग्यूचे डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी दिसून येतात.
डेंग्यू झालेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)