मिठाईशिवाय सणासुदीचा काळ अपूर्ण मानला जातो, पण जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर विचार करूनच मिठाई खावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही मिठाईचा काही वेगळे पर्याय ट्राय वापरून पाहू शकता.
बदामाच्या पिठापासून तयार केलेले लाडू मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतील. कारण बदाम रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.
तुम्ही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नारळ बर्फीही खाऊ शकता. नारळात भरपूर फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे साखरेचे शोषण कमी होते.
खजूर हा नैसर्गिक साखरेचा एक उत्तम पर्याय आहे. अशा परिस्थितीत खजूर आणि सुक्या मेव्याचे लाडू हे दिवाळीसाठी एक उत्तम पर्याय ठरतील.
नेहमीच्या पद्धतीने रव्याचा शिरा बनवताना साखरेऐवजी गूळ वापरा. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ग्लुकोज नियंत्रित राहण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)