चहाने दिवसाची सुरुवात करत नाही अशी व्यक्ती सापडणं तसं कठीणच आहे. जे चहा पित नाहीत ते कॉफी, ग्रीन टी यांचं सेवन करतात.
जर तुम्ही चहाप्रेमी असाल तर मग चहा पिणं हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे समजू शकता. पण आपलं हे चहाप्रेम आरोग्यासाही हानीकारक ठरु शकतं.
पोट भरुन जेवल्यानंतर अनेकांना झोप येऊ लागते. त्यामुळे मग आळस घालवण्यासाठी ते चहा पितात.
जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय ही फायद्यापेक्षा नुकसान करणारी जास्त आहे. चहा प्यायल्यानंतर तात्काळ तुम्हाला हे परिणाम जाणवत नसतील.
पण जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर लगेच चहा पिता तेव्हा शरीर प्रोटीनला व्यवस्थित शोषण्यात असमर्थ ठरतं.
एका रिसर्चनुसार, चहाच्या पानांमध्ये टॅनिक अॅसिड असतं.
टॅनिक अॅसिड अन्नात असणारे प्रोटीन आणि लोह यांना पचू देत नाही आणि अडथळा निर्माण करतं.
त्यामुळे जेवणाच्या आधी एक तास आणि नंतर एक तास चहा पिऊ नये असं सांगितलं जातं.
चहामध्ये कॅफिन असतं हे विसरु नका. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर चहा पिऊ नका