तुम्ही चपाती खाल्ल्यानंतर

'या' चुका करता?

Sep 05,2023


निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार फार महत्त्वाचा असतो. तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.


चपाती खाल्ल्यानंतर कुठल्या गोष्टी करु नयेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात.


आपल्या शरीला दिवसभरात 5 ते 7 लीटर पाण्याची गरज असते. अशावेळी चपाती खाल्ल्यानंतर जास्त पाणी पिल्यास तुमच्या आरोग्यास धोका होऊ शकतो.


चपाती खाल्ल्यानंतर जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिल्यास तुमच्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो.


गरम चपाती खाल्ल्यानंतर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक चुकूनही सेवन करु नका.


जेवणापूर्वी आणि जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात.


आयुर्वेद आणि मेडिकल सायन्सनुसार जेवणानंतर लगेच आंघोळ करु नयेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story