आजकाल आपल्याला सगळीकडेच फास्टफूडच क्रेझ दिसून येत आहे. बदलते जीवन आणि आधुनिकीकरणाबरोबरच आपली पिढी अनहेल्दी पदार्थांकडे सहजपणे आकर्षित होताना दिसत आहे.
पण तुम्हाला माहित आहे का फास्ट फूडमुळे आपले आरोग्य धोक्यात येत आहे. या पदार्थांचा पूर्णपणे परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.याच बरोबर काही सफेद रंगाच्या गोष्टीसुद्धा शरीरासाठी नुकसानकारक असतात.
साखर तुमचा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवते ज्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.
आपल्या जेवणातील पदार्थांमध्ये भात नेहमीच असतो पण भातामुळे शरीरातील पोषक तत्व कमी होतात.
मीठ जेवणाला रूचकर बनवते पण अतिरिक्त मीठाचा वापरमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
सध्या मैदाचा वापर केक, फास्टफूड, ब्रेड यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. मैद्यामुळे पोटाचे विकार आणि डायबिटीजचा धोका वाढतो.