Health Tips : रात्रीच्या वेळी चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या, खाल्लात तर...
Health Tips : रात्रीच्या वेळी तर चुकूनही काही भाज्या खाऊ नयेत. अनावधानानं जर त्या खाल्लात तर त्यानंतर होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठीही सज्ज व्हा.
रात्रीच्या जेवणामध्ये फ्लॉवर न घेतलेलाच बरा. त्यामुळं गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
रात्रीच्या वेळी रताळं खाणंही टाळा. ते आरोग्यदायी असलं तरीही रात्री खाल्ल्यास गॅसेस आणि ब्लोटिंगसारख्या समस्या सतावू शकतात.
रात्रीच्या वेळी कायमच काहीतरी हलका आहार करावा. ब्रोकोली टाळावी, कारण ती सहजासहजी पचत नाही.
मटारची भाजी रात्री खाणं टाळा. यामुळं पचनक्रिया बिघडते.
कांद्याच्या सेवनामुळं पचनास मदत होत असली तरीही रात्रीच्या वेळी मात्र त्याचं सेवन टाळा. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आहारातील बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)