कर्करोग हा जगातील धोकादायक आजारांपैकी एक आहे. भारतातही त्याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदलेली जीवनशैली हे कॅन्सर होण्यामागचे कारण मानले जाते.
तुमच्या आहारातील असे 8 बदल सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कॅन्सरचा धोका कमी करू शकता.
अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांचं सेवन करा. जेणेकरुन कर्करोगाचा आजाराता धोका होणार नाही.
या फळे आणि भाज्यांमध्ये अनेक प्रकारची फळे आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
माशांमध्ये ओमेगा-3 अॅसिड असते. त्याचे गुणधर्म कर्करोगविरोधी आहेत. त्याचा आहारात नक्की समावेश करा.
तुमच्या आहारात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा. मीठ आणि साखरेचे अतिसेवन अनेक आजारांना तसेच कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते.
कॅन्सरचा प्रसार तुमच्या आजूबाजूला होऊ नये म्हणून दारू आणि सिगारेटच्या सेवनापासून दूर राहा.
रोज ग्रीन टी प्या. हे कर्करोगासाठी जबाबदार असलेल्या पेशींना दूर करण्याचे काम करतं.