आज मार्केटमध्ये अनेक बॅण्डचे एनर्जी ड्रिंक्स उपलब्ध असून ते लोकांना प्यायला खूप आवडतात.
तुम्ही जर दररोज एनर्जी ड्रिंक्सचं सेवन करत असाल तर आताच सावधान व्हा. कारण तुम्ही न कळत आजाराला निमंत्रण देत आहात.
होय, अगदी बरोबर...सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यामुळे हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होतो.
जर तुम्हाला तहान गेली असताना तुम्ही एनर्जी ड्रिंक्सचं सेवन केल्यास डिहायड्रेशनचा त्रास तुम्हाला होतो. या पेयामधील कॅफिन, साखर आणि अनेक कृत्रिम फ्लेवर्सचा वापर तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही.
या ड्रिंक्सचं दररोज सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतो. एवढंच नाही तर मधुमेहाचा धोकाही वाढतो.
या ड्रिंक्समुळे दातांच्या बाहेरील थर असलेल्या इनॅमलचं नुकसान होतं. लहान मुलांच्या मानसिक विकारांचा धोका वाढतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)