मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, किडनीचे आरोग्य आणि कॅन्सर यांसारखे मोठे आजार नियमित चालण्याने बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवता येतात
उलटे चालल्याने गुडघ्यांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. यामुळे गुडघ्यांमधील वेदना, तणाव आणि सूज दूर होऊ शकते.
उलटे चालण्याने पाठदुखी कमी होऊ शकते. जेव्हा तुम्ही उलटे चालता तेव्हा तुमच्या पाठीच्या स्नायूंचा व्यायाम होतो.
उलटे चालत असताना, तुमच्या मेंदूला काम करावे लागते आणि अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. यामुळे मेंदूला भरपूर व्यायाम होतो.
उलट चालण्याने पायांच्या मागच्या स्नायूंचाही व्यायाम होतो. यामुळे तुमचे पाय मजबूत होतात. सामान्य चालण्याने पायांवर इतका ताण पडत नाही.
उलटे चालणे तुमचे शरीर आणि तुमचे मन यांच्यातील संतुलन सुधारते. सरळ चालण्याऐवजी, जेव्हा तुम्ही मागे चालता तेव्हा तुमच्या मनाचे पूर्ण लक्ष तुमच्या शरीराच्या हालचालीवर असते.
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी उलट चालणे उत्तम आहे. जेव्हा तुम्ही उलटे चालता तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या भागांचा एकाच वेळी समतोल साधावा लागतो. (सर्व फोटो - freepik.com)