अनेकांना सकाळ सकाळी झटपट नाश्ता म्हणून ब्रेड-जॅम खायला आवडतं. किंवा काही जण चहासोबत देखील ब्रेड खातात.
तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं.
रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.
व्हाईट ब्रेडमध्येही भरपूर परिष्कृत कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे चरबी वाढते.
दीर्घकाळ रिकाम्या पोटी पांढरी ब्रेड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
पांढऱ्या ब्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात ग्लूटेन आढळतं. हे तुमच्या यकृताला नुकसान पोहोचवू शकतं.
व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर सोडियम देखील असतं. त्यामुळे पोट फुगल्याचा फील देखील तुम्हाला येऊ शकतो.
व्हाईट ब्रेडमध्ये व्हिटॅमिन ई आणि फायबर असते, ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते.
येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याला दुजोरा देत नाही.