पोहणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असून त्याने वजनही कमी होते.
तुम्हीही बराच वेळ व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात का? असं असेल तर तुम्ही पोहण्याचा पर्याय निवडू शकता
पोहण्याच्या एका तासात तुम्ही सामान्य चालण्यापेक्षा किंवा व्यायामापेक्षा जास्त कॅलरी बर्न करू शकता. यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होतो
पोहण्यामुळे तुमचा स्टॅमिना आणि लवचिकता वाढण्यास मदत होते. याशिवाय मानसिक आरोग्यही सुधारते.
पोहण्याने तुमचं हृदय आणि फुफ्फुस मजबूत होऊ शकतं.
एक तास पोहल्याने तुम्ही सुमारे 400-700 कॅलरीज बर्न करू शकता.