अनेक जण उन्हाळ्यात जांभूळ भरपूर खातात पण त्याच्या बियांचे फायदे माहित आहेत का?
जांभळाच्या बिया आणि पानांचा उपयोग आयुर्वेदात उपचारासाठी केला जातो.
जांभळामध्ये लोह, प्रथिने, फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात आणि ते अनेक गंभीर आजारांवर फायदेशीर ठरते.
खाज सुटणे आणि खरूज यांसारख्या त्वचेच्या समस्यांसाठी जांभळाचे सेवन करू शकता आणि त्याची साल खाज सुटण्यापासून मदत करते.
मुळव्याधासाठी जांभळाच्या पानांचा रस फायदेशीर असतो.
यकृताला सूज आल्यास जांभळाच्या बियांचा रस प्यायल्याने आराम मिळतो.
किडनी स्टोनची समस्या असेल तर जांभळाच्या बियांची पावडर कोमट पाण्यात टाकून पिऊ शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)