मुलांना चुकूनही लावू नका 'या' 5 पदार्थांची सवय.....

Nov 26,2023


लहान मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ होत असते त्यामुळे त्यांचा आहार योग्य असणं गरजेचं आहे.


लहान मुलांना ताजी फळं, भाज्या, घरी केलेला नाश्ता देऊ शकता. जो आरोग्यदायी असेल.


पण हल्ली लहान मुलांना यापेक्षा बाहेरील पदार्थ खायला खूप आवडतं.


मुलांचे खाण्याचे हट्ट पुरवण्यासाठी जर तुम्ही 'हे' पदार्थ देत असाल तर वेळीच थांबा.

फास्ट फूड्स

लहान मुलांना फास्ट फूड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभदायक आहे असं वाटत. पण आपल्या शरीराला हानी पोहचवणारे हे फास्ट फोड आहे

फ्राइड फूड्स

हल्लीच्या खाण्या पिण्याच्या पदार्थांमध्ये तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. लहान मुलांच्या आवडीच्या पदार्थांतील हे तळलेले पदार्थ आहेत.

प्रोसेस्ड फूड्स

मुलांना काही वेळ रमवण्यासाठी त्यांना बिस्कीट,चिप्स,कुकीज दिल जातं.ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पोषकतत्व नसतात. जर हे जास्त प्रमाणात खाल्लं तर लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांना निमंत्रण असेल.

स्वीट ड्रिंक्स

लहान मुलांना गॉड पदार्थ खायला आणि प्यायला खूप आवडतं.पण याच प्रमाण जास्त झालं तर वजन वाढू शकत आणि दातही किडू शकतात.

आर्टिफिशियल फूड कलर

पदार्थांत फूड कलर असेल तर त्याला कोणती वेगळी चव येत नाही,ते फक्त दिसायला छान दिसतात.खाण्याच्या पदार्थांत फूड कलर जास्त प्रमाणात वापरल्यार आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story