बीट ज्यूस

बीटाचे ज्यूस पिणे खूप पौष्टिक असते. आरोग्यासाठी हे सरबत खूपच फायदेशीर आहे. यामुळे हिमोग्लोबीन वाढायला मदत होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. दररोज सुमारे 250 मिली बीटरूटचे सरबत रक्तदाब नियंत्रित करू शकते आणि रक्तवाहिन्यांना आराम देऊ शकतो. या सरबतामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

May 16,2023

लिंबाचा रस

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबामध्ये जीवनसत्त्व सी असते. हे सरबत प्यायल्याने आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवून, ते मल मऊ करते आणि यामुळे पोट लवकर साफ व्हायला मदत होते.

कैरी पन्ह

उन्हाळ्यात कैरी पन्ह प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. त्यामुळे या दिवसांत कैरी पन्हे आवर्जून प्यावे. कैरी पन्ह्यांमध्ये विविध प्रकारची पोषक तत्त्वे असतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

जांभूळ सरबत

या दिवसांत बाजारात जांभळे सहज उपलब्ध होतात. जांभळे पौष्टिक आहेत. त्यामुळे जांभळाचे सरबत प्यायल्याने तहान भागण्याबरोबरच शरीराच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात.

पालक सरबत

उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये पालक सर्वात फायदेशीर आहे. अनेक पौष्टिक घटकांनी युक्त पालकाचा ज्युस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात पालकाचा ज्युस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

सफरचंद सरबत

सफरचंदाचा ज्युस प्यायल्याने कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, ई, फायबर, रिबोफ्लेविन इत्यादी घटक असतात, जे शरीराच्या विकासासाठी आवश्यक असतात. वजन कमी करण्यासाठी, दमा, कोलेस्टेरॉल इत्यादींसाठी याचा वापर खूप फायदेशीर आहे.

संत्र्याचे सरबत

संत्र्याच्या सरबतामध्ये जीवनसत्त्व सी असते तसेच या फळात फायबरचे प्रमाणही जास्त असते. रोज संत्र्याचा रस प्यायलास रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत राहते. इतर अनेक आजारांपासूनही दूर राहता येऊ शकते. यामुळे उन्हाळ्यात संत्र्याचे सरबत पिणे आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story