दीर्घायुष्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी खावा 'ही' 5 पानं; 100 वर्षांपेक्षा जास्त जगाल

Nov 30,2023

निसर्गाने आपल्याला अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत, ज्यांचं सेवन करुन तुम्ही आजार दूर ठेवत दीर्घायुष्य जगू शकता.

नैसर्गिक गोष्टींचं सेवन करुन तुम्ही शरिर निरोगू ठेवू शकता. यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी काय खाता हेदेखील महत्त्वाचं आहे.

डायटिशिअन्सच्या मते, सकाळी काही पानं खाल्ल्यास शरिराला खूप जास्त फायदा होतो आणि आजारही लांब राहतात.

कडुलिंब

कडुलिंबाचं पान रक्त स्वच्छ करतं आणि त्वचेच्या समस्याही दूर करतं. जर तुम्हाला एग्जिमाची समस्या असेल तर कडुलिंबाच्या पानाचं सेवन मदत करतं.

कढीपत्ता

कढीपत्ता आपण स्वयंपाकात वापरतो, पण रिकाम्या पोटी त्याचं सेवन केल्याचेही फार फायदे आहेत. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉलची समस्याही जाणवत नाही.

अजवायन

अजवायनच्या पानांचं सेवन अपचनची समस्या दूर करते. जर तुम्हाला ब्लोटिंगचा त्रास असेल तर रिकाम्या पोटी अजवायनच्या पानांचं सेवन करा.

तुळस

तुळशीच्या पानाचं सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे आजार दूर राहतात. तुळशीचं पान संसर्ग संपवतो आणि रक्तही स्वच्छ ठेवतं.

सदाबहार

सदाबहारच्या पानात कॅन्सरिवरोधी गुण आढळतात. रिकाम्या पोटी पानं खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.

रोज सकाळी अशा प्रकारची पानं रिकाम्या पोटी चावून खा. यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही अन्य काही खाऊ शकता.

पण जर तुम्हाला एखादा आजार असेल तर ही पानं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

VIEW ALL

Read Next Story