सकाळी भूक लागलेली असताना चहासह बिस्किट खाणं अनेकांना आवडतं. अनेकांचा तर हा रोजचा ब्रेकफास्टच असतो.
अनेकजण तर लहानपणासून चहा बिस्किट खात असून दिवसातून अनेकवेळा हा उपक्रम सुरु असतो
पण सकाळी रिकाम्या पोटी चहा बिस्किट खात तुम्ही अनेक शारिरीक समस्यांना निमंत्रण देत असता. कसं ते समजून घ्या
सकाळी चहासह बिस्किटी खाल्ल्याने अॅसिडीटीची समस्या उद्भवू शकते. पोटातील चरबी वाढू शकते तसंच पौष्टिक शोषणात बाधा येऊ शकते. याशिवाय रक्तातील साखरेचं प्रमाणही वेगाने वाढू शकतं
चहासह बिस्किट खाल्ल्याने आतड्याच्या आऱोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात
बिस्किट आणि चहामध्ये कृत्रिम साखर असल्याने ब्लड शुगरचं प्रमाण वाढू शकतं.
बिस्किटातील मैदा तुमच्या शरिरारातील अनहेल्दी फॅट वाढवतं, ज्यामुळे पचनासंबंधी समस्या निर्माण होते.
जर पोट फुगत असेल सकाळी धन्याचं पाणी प्या. तसंच बद्धकोष्ठता असेल तर एलोवेराचा ज्यूस प्या. एक ग्लास पाण्यात 15 मिली एलोवेरा मिसळा आणि प्या. बडीशेपचं पाणीही पचनात सुधार आणि आतड्यांची सूज कमी करतं.