नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात, पुरुष इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात हे पाहण्यात आलं.
कमकुवत इरेक्शन नपुसंकतेचं लक्षण आहे का? या विषयावर 68,600 लोकं दरवर्षी सर्च करतात.
दाढी केल्याने दाढीचे केस जास्त वाढतात का? या विषयावर दरवर्षी सरासरी 68,400 लोक सर्च करतात.
पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होतो का? हे सर्च करणाऱ्यांची संख्या 61,200 इतकी आहे.
टोपी घातल्याने किंवा शेंडी वाढवल्याने पुरुषांचे केस गळतात का यावर सरासरी 52,100 लोक दरवर्षी सर्च करतात.
व्यायामानंतर प्रोटीन लगेच घ्यावं की नंतर, त्याचप्रमाणे कोणतं प्रोटीन घ्यावं यावर 51,000 लोकांनी सर्च केलंय.