Food To Avoid In Winters: थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. थंडीमध्ये फळ, भाज्या, गरम आणि पौष्टीक पदार्थ खायला हवेत. पण थंडीमध्ये कोणत्या पदार्थांपासून आपल्याला दूर राहायला हे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला थंडीत आजारी पडायचे नसेल, आरोग्य चांगले ठेवायचे असेल, रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर पुढे देण्यात आलेले पदार्थ शक्यतो टाळा.
अन्यथा तुम्हाला व्हायरल ताप होण्याची शक्यता आहे. आजारी न पडण्यासाठी पुढील पदार्थ टाळा.
फ्रिजमधून कोल्ड्रिंगकाढून थेट पिणे हे आजाराला आमंत्रण आहे.
थंडीत दूध, मिल्कशेक आणि स्मूदी यासारखे थंडे पदार्थ खाऊ नका. दुपारच्या जेवणानंतर दही खाऊ नका.
थंडीत नॉनवेज पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे शरीरात सुस्ती येते. तसेच पचनाच्या समस्या निर्माण होतात. वजनही वाढते. त्यामुळे हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.
या पदार्थांमध्ये साखर खूप असते. साखर शरिरात इन्सुलिन रेजिस्टेंट विकसित करते. यामुळे इम्युनिटी कमजोर होते.
ताजी फळे खाणे हा यावर उपाय आहे. पॅकेटवाल्या फळांचा ज्यूस पिऊ नका. थंडीत ताज्या फळांचा ज्यूसही जास्त पिऊ नका.
थंडीत आपण गरमागरम भजी आणि तूप लावलेले पराठे खाण्याचा विचार करतो. हे पदार्थ खायला खूप चवदार असतात. पण यापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
थंडीच्या दिवसात खूप सण येतात. अशावेळी मिठाई खाल्ली जाते. पण मिठाईत मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे यापासून दूर राहायला हवे.