एखाद्याचा परफॉर्मन्स बघून अंगावर काटा आलेला आपण टीव्ही शोमध्ये पाहिले असेल.
अंधारात किंवा भयाण शांततेत एखादी वस्तू अचानक अंगाला शिवल्यावरही अंगावर काटा येतो.
आपण एखादी अनपेक्षित गोष्ट पाहिल्यावरही अंगावर काटा येतो.
पाइलोइरेक्शनच्या प्रक्रियेमुळे अंगावर काटा येतो. अशावेळी शरीरावरील केस काही वेळासाठी उभे राहतात.
न्यूयॉर्कच्या कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक किथ रोच यांच्यामध्ये गूजबम्प्स शरिरासाठी फायदेशीर ठरतात.
याचा आवाज आणि दृश्यांशी जवळचा संबंध आहे. सिनेमात तुम्ही अनपेक्षित सीन्स बघता तेव्हा गूजबम्प्स येतात.
मेंदूचा खास भाग 'इमोशनल ब्रेन' धोक्याच्या आवाजावरही प्रतिक्रिया देतो. मेंदूला वाटत हे काही सामान्य नाही. कोणती तरी क्रिया आहे. ज्यामुळे शरिराला धोका निर्माण होऊ शकतो.