मुलांच्या डोक्यात उवा झाल्यात; नक्की ट्राय करा हे घरगुती उपाय
Feb 05,2024
केसांची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे.
केस स्वच्छ धुतले नाहीत तर केसात कोंडा, उवा होतात.
ही समस्या सामान्य असली तरी यामुळे खुप त्रास होतो.
अस्वच्छ केसांमुळे केसात उवा, लिखा होतात. यामुळे केस निर्जीव आणि निरुपयोगी दिसतात.
केसात उवा होण्याची कारणं म्हणजे अस्वच्छ केस आणि उवा असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं.
उवांपासून कायमची सुट्टी हवी असेल तर, हे घरगुती उपाय नक्की करा.
तुळशीची पानं केसातील उवांवर रामबाण उपाय आहेत.
खोबरेल तेलात तुळशीची पान घालून, हे तेल रोज केसांना लावा.
तुळस ही प्रत्येक रोगावर गुणकारी आहे. केसातील उवा घालवण्यासाठी तुळशीचं हे तेल केसांना लावा.
याचबरोबर तुम्ही कडुलिंबाच्या पानांनी सुद्धा केस धुवू शकता. यामुळे सुद्धा केसातील उवा कमी होतील.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)