आयुर्वेदामध्ये निलगिरीच्या तेलाला अनंन्यसाधारण असं महत्त्व आहे. नीलगिरीच्या तेलामध्ये अललेले अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे शारीरिक समस्यांवर फायदेशीर ठरतं.
नीलगिरीचं तेल जंतूनाशक मानलं जातं. सर्दी आणि डोकेदुखीवर नीलगिरीचं तेल रामबाण उपाय आहे.
श्वसनाचा त्रास होत असल्यास नीलगिरीच्या तेलाने छातीला मालिश केल्यास ऊब मिळते, त्यामुळे शरीराला आराम पडतो.
त्वचेवर सतत खाज,पुरळ येत असल्यास निलगिरीच्या तेलाचा मसाज केल्यास इंनफेक्शन दूर होते.
जर तुम्ही दाढदुखीने त्रस्त असाल तर दात घासताना निलगिरीच्या तेलाचे काही थेंब ब्रशवर घेऊन दात घासल्यास दाढदुखी कमी होते.
थंडीच्या दिवसात पायात गोळे येणं किंवा वाताचा त्रास जाणवत असल्यास निलगिरीच्या तेलाने मालिश केल्यास शरिराला ऊब मिळते.
सतत खोकला सुरू असल्यास निलगिरीच्या तेलाने मसाज केल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)