भेंडीचं पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

भेंडीच्या भाजीबरोबरच भेंडीचे पाणीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विविध पोषकतत्वं असणारं हे पाणी प्यायल्याने शरिराला फार फायदा होतो.

Aug 14,2023

भेंडीचं पाणी कसं तयार करायचं?

3 त 4 भेंडी कापून एका ग्लास पाण्यात टाका. भेंडी रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर सकाळी भेंडी पाण्यातून काढून रिकाम्या पोटी हे पाणी प्या.

आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर

भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह मुबलक प्रमाणात आढळतात, जे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात.

वाढतं वजन आणि बद्धकोष्ठता

वाढतं वजन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांसाठी भेंडीचे सेवन खूप फायदेशीर आहे.

प्रतिकारशक्ती

भेंडीचं पाणी प्रतिकारशक्ती वाढवण्यात फार मदतशीर ठरतं. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच बदलत्या ऋतूमुळे होणाऱ्या ऍलर्जीपासून संरक्षण होते.

दृष्टी सुधारणे

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही भेंडीचे पाणी गुणकारी मानले जाते.

व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन

भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, जे दृष्टी वाढवण्याचे काम करते.

अॅनिमियापासून संरक्षण

भेंडीच्या सेवनाने अॅनिमियाची समस्याही दूर होते. वास्तविक, भेंडीमध्ये भरपूर लोह असते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.

रक्तस्त्राव रोखण्यास मदत

हिमोग्लोबिन वाढल्याने अशक्तपणाची कमतरता दूर होते. याशिवाय भेंडीमध्ये असलेले जीवनसत्त्वे रक्तस्त्राव रोखण्यासही मदत करतात.

वजन वाढू देत नाही

भेंडीत भरपूर फायबर असते. भेंडीची भाजी आणि पाणी सेवन केल्याने चयापचय क्रिया योग्य राहते, ज्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण राहते. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात भेंडी आणि पाण्याचा समावेश करावा.

VIEW ALL

Read Next Story