पुरणपोळीचे फायदे ऐकून हेल्थ-हेल्थ करणारेही खायला लागतील!

Jan 29,2024


प्रत्येक सणाला पुरणाची पोळी बनवली जाते. पुरणपोळीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकामुळे शरीराला फायदे होतात


होळीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रातल्या अत्यंत लोकप्रिय असा हा पदार्थ आहे.


पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. थंडी सरलेली असते आणि उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झालेली असते.


या काळात पुरणपोळी खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. गव्हाचे, मैदा, हरभऱ्याची डाळ, गूळ, वेलची, जायफळ असे घटक एकत्र करून पुरणपोळी केली जाते.


यातील प्रत्येक घटकात स्वत:चे गुणधर्म आहेत. त्यामुळे हे घटक एकत्र झाल्याने शरीराला चांगले फायदे होतात.


गव्हाचे पीठ आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे हा पदार्थ आणखी पौष्टीक होईल. गव्हाच्या पिठात तयार केलेल्या पुरण पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्वे आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो.


तसेच कणीक आणि डाळ एकत्र केल्याने तुम्हाला प्रथिने मिळतात. तसेच अमिनो अॅसिड मिळत असल्याने शरीरास अधिक फायदा होतो.


गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. वेलची, केशर, जायफळ पावडर हे घटक पचन आणखी वाढवतात. त्यामुळे पुरणपोळी खाऊन शरीराला या काळात फायदाच होतो.

VIEW ALL

Read Next Story