अंड्याला प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत मानलं जातं. निरोगी आरोग्यासाठी अंड महत्त्वाचं असतं.
शाकाहारी लोकांना अशक्तपणा घालवण्यासाठी क्विनोआ हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर, मॅग्नेशिअम आणि आयर्न असतं.
हे तुम्हाला ऊर्जा देतं आणि स्टॅमिना वाढवण्यात मदत करतं. क्विनोआला मुख्य किंवा साईड डिश म्हणूनही खाऊ शकता. सूपमध्येही याचा वापर करु शकता.
बदाम हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबरचा स्त्रोत आहे. हे तुम्हाला ऊर्जा देतात आणि शक्ती वाढवण्यात मदत करतात.