जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी?
जेवणानंतर लगेचच झोपणं टाळा. हे शरीरासाठी चांगलं नाही.
जेवल्यानंतर काही वेळ चालणं कधीही फायद्याचं. त्यामुळं ही सवय मोडू नका. पण नेमकं किती वेळ शतपावली करावी हे माहितीये?
जेवणानंतर तुम्ही किमान 20 मिनिटं शतपावली करावी. असं केल्यानं अन्नपदार्थांची पचनक्रीया सुरळीत आणि सोपी होते.
शतपावलीमुळं पचनक्रिया अगदी योग्य काम करते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहतं.
जेवणानंतरच्या शतपावलीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
नैराश्य, तणाव आणि तत्सम मानसिक ताण कमी होतो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)