5 प्रकारची पीठं

घरात ठेवा ही 5 प्रकारची पीठं; आजारपण उंबरा ओलांडणारच नाही

तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला माहितीये का? वजन कमी करण्यासाठीसुद्धा आहारात काही बदल केले जातात. यामध्ये मदत होते ती म्हणजे चपाती, भाकरी आणि तत्सम पदार्थांची. घरात असणारी पीठं नकळतपणे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी मदत करतात.

बाजरीचं पीठ

गव्हाच्या चपातीऐवजी तुम्ही बाजरीची भाकरीसुद्धा खाऊ शकता. यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहून, कोलेस्ट्रॉलही आटोक्यात राहतं.

मक्याचं पीठ

झिंक, लोह आणि अनेक रोगप्रतिकारक तत्त्वं असणाऱ्या मक्याच्या पीठामुळं त्वचा चमकदार होते.

चणाडाळीचं पीठ

व्हिटामिन, प्रोटीन आणि उर्जेची खाण असणाऱ्या चणाच्या, चणाडाळीच्या पीठाचाही जेवणात वापर करावा. यामुळं स्नायूंना बळकटी मिळते.

नाचणीचं पीठ

नाचणीच्या पीठामध्ये लोह, कॅल्शियमसारखे घटक असून, त्यांच्यामुळं हाडांना बळकटी मिळते. शिवाय शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते.

राजगिऱ्याचं पीठ

प्रोटीन आणि फायबरयुक्त अमरनाथचं पीठ अर्थात राजगिऱ्याचं पीठ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, स्नायूंच्या वाढीसाठी मदत करतं.

VIEW ALL

Read Next Story