अनेकांना गोड खाण्याची सवय असते. पण अती गोड खाणं आरोग्यास हानीकारक ठरु शकतं.
शरीरात साखरेचं प्रमाण वाढलं तर अनेक आजार उद्भवू शकतात. पण साखरेचं प्रमाण कमी केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
साखरेचं प्रमाण कमी झाल्यास मूड स्विंग कमी होऊ शकतात. यामुळे जास्त तजेलदार वाटतं
साखरेचं प्रमाण वाढल्यास त्वचेवर सूज येऊ शकते. पण साखरेचं प्रमाण कमी झाल्यास त्वचा साफ आणि चमकती दिसते.
साखर खाण्याचं सर्वात मोठा तोटा म्हणजे मधुमेह. पण साखरेचं प्रमाण कमी केल्यास संपूर्ण दिवसभर शरीरातील उर्जा स्थिर राहाण्यास मदत होते.
साखरेमुळे पचनक्रिया धीमी होण्याचीही भीती असते. पण साखरेचं प्रमाण कमी केल्यास पचन क्रिया योग्य काम करते.
साखरेचं प्रमाण वाढल्याने हृद्यरोगाचे धोके वाढू शकतात. ते कमी करण्यासाठी अती गोड खाणं टाळा.
साखरेमुळे दातांमध्ये बॅक्टेरिया होतात आणि दात किडू लागतात. पण साखर खाणं टाळल्यास हे दातांची योग्य निगा राहण्यास मदत होते.