माणूस हा संवेदनशील आहे. विविध भावभावना आणि त्यांच्या शरीरावर उमटणार्या प्रतिक्रिया हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. 'अंगावर काटा येणे' ही अशीच एक प्रतिक्रिया आहे.
अंगावर काटा येण्याची अनेक कारणं आहेत. भीतीने, प्रेमाने, आश्चर्याने इतकंच काय तर साहसी कथा, देशभक्तीपर गाणी ऐकतानाही अंगावर काटे येतात.
अंगावर काटा येण्याला अंगावर शहारे येणं असंही म्हणतात. त्वचेवरच्या बारिक बारिक पेशींच्या आकूंचन, प्रसरणाने शहारे येतात
अंगावर काटा येणं किंवा शहारे येणं याला इंग्रजीत Goose Bumps म्हणतात, ही एक सामान्य गोष्ट आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अंगावर शहारे येण्याचा अनुभव घेतला असेल
शरीरातील एका विशिष्ट हार्मोनमुळे अंगावर शहारे येण्याची क्रिया होत असते. या हार्मोनमुळे शरीरातील काही स्नायू सैल होतात.
सैल झालेले स्नायू अचानक काही सेकंदांसाठी पुन्हा ताणले जातात. या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेवरील केस उभे राहतात. याला आपण 'अंगावर काटा येणे' असं म्हटलं जातं.