दातांचं आरोग्य टिकवण्यसाठी चांगल्या क्वालिटीचे टूथब्रश वापरण्याचा सल्ला डेंटिस्टकडून दिला जातो. तसंच 2 ते 3 महिन्यातून एकदा आपला टूथब्रश बदलण्यासही सांगितलं जातं.

May 13,2024


पण अनेक जण दात घासून झाले की टूथब्रश बाथरुमध्येच ठेवतात. खासकरुन तुमचं बाथरूम आणि टॉयलेट एकच असेल तर तुम्ही टूतब्रश तिथे अजिबात ठेवू नका.


टूथब्रश बाथरुममध्ये ठेवणं तोंडाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. बाथरुममध्ये मलद्वारे विषाणू (Fecal Bacteria) पसरतात. हवेद्वारे हे विषाणू टूथब्रशवर साठतात.


टूथब्रशमुळे हे विषाणू तोंडावाटे रक्तप्रवाहात पोहोचू शकतात. यामुळे तुमच्या तोंडाचं आणि एकूणच शारिरीक आरोग्य बिघडू शकतं. शरीरावर विविध आजारांचं संक्रमन होण्याची शक्यताही वाढते


विशेषता बाथरुम अटॅच्ड टॉयलेट असेल तर कमोड सीटच्या बाजूला टूथब्रश ठेवण्याची चूक कधीच करुन नका. कारण टॉयलेट सीटच्या आसपास जास्त विषाणू असतात.


याशिवाय बाथरुममध्ये पाण्यामुळे हवेत ओलावा असतो, त्यामुळे टूथब्रशवर बुरशी वाढण्याचा धोका असू शकतो.


बाथरुमच्या बाहेर टूथब्रश ठेवण्यास जागा नसेल, तर टूथब्रशला कव्हरमध्ये ठेवा, दात घासण्याआधी टूथब्रश पाण्याने स्वच्छ धुवा जेणेकरुन टूथब्रशमध्ये असलेले विषाणू निघून जातील.

VIEW ALL

Read Next Story