सकाळी रिकाम्यापोटी अंडी खाण्याची तुम्हाला सवय असेल तर वेळीच सावध व्हा
अंड हे एक परफेक्ट ब्रेकफास्ट असल्याचं मानलं जातं. अनेकजण ब्रेकफास्टमध्ये अंड्याला प्राधान्य देण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यापासून बनवणारे पदार्थ कमी वेळात तयार करता येतात.
बरं अंड खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं हा अंड्यांना पहिली पसंती मिळण्यामागील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा.
खरं तर अंडी ही आरोग्यसाठी फायद्याची असतात. अंड्यांमध्ये अनेक पोषक तत्वं असल्याने अनेकदा डॉक्टरही अंडी खाण्याचा सल्ला देतात.
मात्र रिकाम्यापोटी अंडी खाणं हे आरोग्यासाठी घातक ठरु शकतं याची फार कमी लोकांना कल्पना आहे. या समस्या कोणत्या पाहूयात...
अंड योग्यपद्धतीने शिजवलेलं नसेल तर न शिजलेलं अंड खाऊन फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंड्यामध्ये साल्मोनेला नावाचा विषाणू आढळून येतो ज्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका संभवतो.
रिकाम्यापोटी अंड खाल्ल्याने काहीजणांना पचनासंदर्भातील समस्या निर्माण होतात.
पोटात गॅस होणे, पोट दुखणे यासारख्या समस्यांना अशा लोकांना रिकाम्यापोटी अंड खाल्ल्यास तोंड द्यावं लागतं.
अंड्याची एलर्जी असेल तर रिकाम्यापोटी अंड खाल्ल्यास अंगाला सूज येऊ शकते.
अंड्यांची एलर्जी असलेल्यांनी अंड खाल्ल्यास त्यांना श्वास घेण्यासही अडचण निर्माण होऊ शकते.
बराच काळ रिकाम्यापोटी नाश्त्याला अंडी खाण्याची सवय असेल तर शरीराला आवश्यक ती सर्व पोषक तत्वं मिळत नाहीत.
नाश्त्यामध्ये केवळ अंड्यांचा समावेश करु नये. अशा पदार्थांचाही नाश्त्यामध्ये समावेश असावा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन्स असतील.
अंड खाण्यापूर्वी ते योग्य पद्धतीने शिजलेलं आहे याची खात्री करुन घ्या. कच्चं अंड खाण्याची चूक महागात पडू शकते.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. आरोग्यासंदर्भातील समस्यांसाठी आपल्या फॅमेली डॉक्टरचा सल्ला घ्यावा.