शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी आण हाडांशी संबंधित समस्या निर्माण होतात.
युरिक अॅसिड तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेही कमी करु शकता. फळांचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही पाच ज्यूसचे सेवन करुनही युरिक अॅसिड कमी करु शकता.
अननसाच्या रसात ब्रोमेलॅन नावाचे एजाइम असते. त्यामुळं शरीरातील युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.
गाजर-काकडी आणि ओवा टाकून त्याचा ज्यूस बनवून घ्या. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी रोज सकाळी याचे सेवन करा.
आल्याचे काही तुकडे ठेचून घ्या व त्यानंतर पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर प्या.
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी चेरीचा ज्यूस खूपच फायदेशीर आहे. वेदना आणि सूज कमी करण्यासाठी चेरीचा ज्यूस प्या.
अननसाचा रस काढून घ्या त्यानंतर त्यात दोन चमचे हळद आणि 3 चमचे किसून घेतलेले आले टाकून हा रस प्या
काकडी, गाजर आणि बीट याचा ज्यूस बनवून घ्या. ही व्हेजिटेबल स्मूदी युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करते.