वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करुन पाहत असतात. सोशल मीडियावरही वजन कमी करण्याचे सल्ले देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
अशीच एक पोस्ट सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, पपई खाऊन तुम्ही सात दिवसात 2 किलो वजन कमी करु शकता.
Indian_veg_diet नावाच्या पेजवर पोस्ट शेअर करताना लिहिण्यात आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी पपई सर्वोत्तम आहे. कारण यामध्ये फार कमी कॅलरी असते.
पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की "पपई फायबरसाठी चांगला स्त्रोत आहे, ज्यामुळे भूक कमी होते. तसंच पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं".
पपईने तात्काळ वजन कमी करण्यासंबंधी आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वेट लॉससाठी पपई फायद्याचं आहे. 100 ग्रॅम पपईमधून 32 कॅलरी मिळतात.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, पपईत विटॅमिन ए, सी आणि ई असतं. हे खाल्ल्याने भूक कमी होते.
पण फक्त एखादी गोष्ट खाऊन वजन कमी केलं जाऊ शकत नाही असंही आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
वजन कमी करण्यासाठी सर्व पोषकतत्वांचा समावेश असणारा डाएट केला पाहिजे. तसंच कॅलरीवर लक्ष दिलं पाहिजे.
फळं खाल्ल्याने शरिराला फायदा होतो हे खरं आहे. पण फळांमध्ये नैसर्गिक साखर असते हेदेखील विसरता कामा नये. त्यामुळे त्यांचं योग्य प्रमाणात सेवन केलं पाहिजे.