कोपऱ्याकोपऱ्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्या थाटलेल्या दिसतात. पण असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत.
जंक फुडमुळे हाय कोलेस्ट्रॅाल, हाय ब्लड प्रेशर, हृदयाच्या समस्या, वजन वाढणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
झटपट मिळणारे अनेक पदार्थ आहेत. बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक आहेत.
चिप्स शरीरासाठी खूप हानिकारक असतात. चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आणि फॅट्स असतात
पॅकबंद अन्न शरीरासाठी हानिकारक आहे कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे वजन वाढते आणि मधुमेहचा त्रास होतो
प्रक्रिया केलेल्या तेलापासून बनवलेले पदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात, त्यामुळे ते खाणं टाळा
व्हाईट ब्रेड, पेस्ट्री, पिझ्झा पास्तामध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात आणि हे पदार्थ शरीरासाठी चांगले नाहीत
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे, की जंक फूडच्या अति सेवनाने शरीरातल्या इन्सुलिनची (Insulin Level) पातळी गरजेपेक्षा जास्त वाढते
मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक वाढीवर मोठा परिणाम होतो. शिवाय लहान वयातच हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा असे विविध आजार जडू शकतात.
मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक घटकांची गरज यातून पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक आजार मुलांना कमकुवत करतात.