टोमॅटो केचपचे अतिसेवन हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात. टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात फ्रक्टोज असते ज्यामुळे ट्रायग्लिसराइड नावाचे रसायन तयार होते. हे रसायन हृदयासाठी घातक ठरू शकते.
काही लोकांना अन्नपदार्थांत वापरल्या जाणाऱ्या रंगाची अॅ लर्जी असते. केचप सुद्धा रंग दाट आणि लालसर दिसावा यासाठी त्यात फूड कलर वापरण्यात आलेले असतात. या रंगामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या अथवा सर्दी, खोकला, पित्त अशा समस्या होऊ शकतात.
जास्त टोमॅटो केचप खाल्ल्याने शरीरात अॅलर्जी होऊ शकते. कारण केचपमध्ये हिस्टामाईन्स केमिकलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे टोमॅटो केचपचे जेवढ्यात तेवढेच सेवन करा.
टोमॅटो केचपचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमचे युरीनमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढू शकते. ज्याचा आपल्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते.
टोमॅटो केचप अम्लीय असते. केचपमध्ये गोड आणि आंबट असे मिश्रण असते. ज्याचे जास्त प्रमाणात खाल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या नाकारू शकत नाही.
टोमॅटो केचअपचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे वजन वाढीस कारणीभूत ठरू शकता. शिवाय इन्सुलिनचे प्रमाण कमी होते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
टोमॅटो केचपचे जास्त सेवन केल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. कारण त्यामुळे शरीरातील सोडियम आणि साखरचे प्रमाण वाढू शकते. तुम्ही जर हे केचप प्रमाणापेक्षा जास्त खालात तर आरोग्याला हानीकारक ठर शकतात.