मायग्रेनच्या वेदनांवर रामबाण उपाय आहेत 'या' हर्बल टी

Aug 08,2024


मायग्रेनमुळे सतत डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशावेळी काहीजण औषधांची मदत घेतात.


पण तुम्हाला माहित आहे का मायग्रेनच्या त्रासासाठी तुम्ही हर्बल टीचं सेवन केलं तर ते फायदेशीर ठरते. तुम्हालासुद्धा मायग्रेनचा त्रास असेल तर या हर्बल टी नक्की ट्राय करा.

पेपरमिंट चहा

यामध्ये मेन्थॉल असते जे डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हर्बल टी पिऊ शकता.

लॅव्हेंडर चहा

लॅव्हेंडर हे एक फूल आहे. त्याचा चहा करून प्यायल्याने मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळतो.यामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात.

जायफळ चहा

जायफळ हे मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी मदत करते. चहा बनवताना जायफळ पावडर आणि आले टाकले तर वेदनेसाठी ते गुणकारी आहे.

आल्याचा चहा

आपण बऱ्याचवेळा दूधाच्या चहामध्ये आलं टाकतो. असं केल्याने आल्याची चव चहामध्ये उतरते आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.


या हर्बल टी बनवण्यासाठी दूधाचा वापर करावा लागत नाही. हे करण्यासाठी एका भांड्यात दीड कप गरम पाणी आणि तुम्हाला हव्या असलेल्या वनस्पती घाला. ते चांगले उकळवा आणि नंतर गाळून कोमट करून प्या.

VIEW ALL

Read Next Story