मल्टीग्रेन पदार्थांता समावेश जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये केला तर तुमचं वजन कमी करण्यास नक्कीच मदत होईल.
मल्टीग्रेन चिलामध्ये नाचणी, ज्वारी, रवा आणि बेसन असतात, जे वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट असून चविष्ट देखील असतात
गव्हाचे , मक्याचे आणि ओट्सचे जाडे भरडे पीठ, मशरूम, पेस्टो सॉस आणि मोझझेरेला चीज यांचे मिश्रण वापरून तुम्ही पिझ्झा बनवू शकता. त्यात कार्बोहाइड्रेट आणि फॅटचे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.
थेपला हा एक लोकप्रिय गुजराती पदार्थ आहे. जो फक्त गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाचणी, ज्वारी आणि बेसन वापरून आणि मेथी ही पालेभाजी वापरून तुम्ही थेपला बनवू शकतात.
सोया, नाचणी आणि ज्वारीच्या पिठापासून बनलेला मल्टीग्रेन पराठा पौष्टिक आणि वजन कमी करण्यास मदत करतो.
मल्टीग्रेन इडली हा कमी-कॅलरीसाठी उत्तम पर्याय आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी नाचणी, ज्वारी, बाजरी वापरून बनवता येईल.
व्यायामासोबत तुम्ही योग्य तो आहार करणं देखील वजन कमी करण्यासाठी तुमची मदत करू शकतं. (All Photo Credit : Social Media/ Freepik) (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)