आपल्या जेवणात लज्जतदार पदार्थ हे आपल्याला हवेच असतात. त्यातून आपल्यासाठी असे पदार्थ खाणं ही एक पर्वणीच असते.
दर विकेंडला आपण काहीतरी वेगळं ट्राय करायला हवं म्हणून एकतर आपण बाहेर हॉटेलमध्ये तरी जायचा प्लॅन आखतो किंवा घरीच मस्तपैंकी असं जेवण तयार करतो.
त्यातून इतर मसाल्यांच्या पदार्थांबरोबर गरज असते ती म्हणजे हिंग. परंतु तुम्हाला माहितीये का की हिंगाच्या अतिसेवनानं तुमच्या शरीरावर परिणामही होऊ शकतो.
काही व्यक्तींना याचे सेवन टाळावे. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेऊया की नक्की कोणत्या व्यक्तींनी अतिसेवन करणं टाळलं पाहिजे.
जर का तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास आहे आणि तुम्ही जर हिंगाचे अतिप्रमाणात सेवन करत असाल तर तुम्ही याचे सेवन करणं टाळावं.
त्यातून गरोदर बायकांनी खासकरून हिंग खाणं हे टाळावं कारण त्यानं गर्भपात होण्याचा धोका असतो.
स्तनपान करताना जर का तुम्ही हिंग खाल्ले असेल तर त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. हिंगाचे अतिसेवन केल्यानं त्वेचेवर पुरळ येते.