डासांमुळे अनेक आजार तर होतातच पण त्यांच्या घरातील वावरामुळे मोठी अडचणी निर्माण होते, त्यामुळे हे घरगुती उपाय करून तुम्ही डासांपासून मुक्ती मिळवू शकता.
रोझमेरीचे देठ डासांना दूर ठेवण्यासाठी उत्तम आहे. घराच्या आत रोझमेरीचे फक्त काही देठ जाळून ठेवा. यामुळे तुम्ही घरातील डासांपासून प्रभावीपणे मुक्त मिळू शकते.
टी ट्री ऑइलचे काही थेंब काही पाण्यात मिसळा आणि त्वचेवर लावा. हे अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल ऑइल असल्यामुळे ते डासांना दूर ठेवण्यासाठी मदत करतात, शिवाय डास चावल्यावरही ही तेल औषध म्हणून लावू शकता.
फिवरफ्यू,, सिट्रोनेला आणि कॅटनिपसारख्या काही वनस्पती डासांना दूर ठेवण्यासाठी ओळखल्या जातात. तुम्ही या वनस्पती तुमच्या बागेत लावू शकता, तसेच घराच्या खिडकीजवळ किंवा दारापाशी ठेवू शकता, या वनस्पतींमुळे डास तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत
तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा छतावर पाण्याचे डबके असतील तर सर्वत्र काही कॉफी पावडर टाका. यामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांनी घातलेली अंडी आपोआप पाण्यावर तरंगतील, या अंड्यांना योग्य ऑक्सिजन न मिळाल्याने ती मरून जातील, अशाप्रकारे तुम्ही डासांना घरात शिरण्यापासून रोखू शकता.
डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूर तेल हा सर्वात चांगला उपाय आहे. घराचा दरवाजा आतून बंद करा आणि घरात कापरचा जाळून धूर करा, कपूर असेच 20 मिनिटे राहू द्या. कापराच्या वासामुळे तुमच्या घरात डासांविरोधात एक सुरक्षा कवच तयार होईल.
एक कप पाण्यात पेपरमिंट ऑइलचे काही थेंब टाका आणि स्प्रे कॅनमध्ये भरा. हे मिश्रण तुम्ही तुमच्या त्वचेवर स्प्रे करा. पेपरमिंट ऑइलमध्ये रासायनिक संयुगे असतात जे डासांना दूर ठेवू शकतात, यामुळे अंगाला पुदिन्याच्या येणाऱ्या वासामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
थोडे कडुलिंब आणि लॅव्हेंडर तेल 1:1 या प्रमाणात मिक्स करून ते त्वचेवर लावा. यामुळे डास तुम्हाला सहसा चावणार नाहीत. घरात लावता त्या कमर्शियल कॉइलपेक्षा कडुलिंबाचे तेल डासांना चांगल्याप्रकारे आपल्यापासून दूर ठेवतात.
लवंग आणि लिंबू हा देखील डासांना दूर ठेवण्याचा एक उत्तम उपाय आहे. काही लिंबांचे अर्धे तुकडे करा आणि त्या प्रत्येक तुकड्यात एक लवंग चिकटवून ठेवा. ज्याठिकाणी डास जास्त येतात त्याठिकाणी हे लवंग टाकलेले लिंबूचे तुकडे ठेवा.
तुमच्या दारात किंवा खिडकीत तुळशीच एकतरी रोप तरी लावा. कारण तुळस ही औषधी वनस्पती असल्यामुळे डासांना दूर ठेवण्यास मदत करते, तसेच डास चावल्यानंतर अंगावर येणाऱ्या मोठ्या फोड्यावर तुळशीची पानं चोळणे फायदेशीर ठरते.
लसणाच्या तीव्र वासामुळे डासांना दूर ठेवण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्याव्या लागतील, मग त्या गरम पाण्यात थोड्या उकळवा आणि ते पाणी एका बाटलीत भरून घरभर स्प्रे करा. यामुळे घरातून डास पळून जातील.