पण दिवसातून किती पाणी प्यावं याची अनेकांना माहिती नसते. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. चांगलं आरोग्य राखण्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे.
कमी पाणी प्यायलाने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे दररोज शरीरात पाण्याची पुरेशी मात्रा असणं आवश्यक आहे.
पाण्यात अनेक प्रकारचे व्हिटामीन आणि मिनरल असतात. यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
एका दिवसात 3 ते 4 लीटर किंवा 8 ग्लास पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
लघवीच्या रंगाद्वारे शरीरात पाण्याची किती आवश्यता आहे हे समजू शकतं. लवघीचा रंग सामान्य असेल तर शरीरात पाण्याची मात्रा पुरेशी आहे.
पण लघवीचा रंग गडद पिवळा असल्यास तुमचं शरीर डीहायड्रेटड आहे. तुम्हाला पुरेसं पाणी पिण्याची गरज आहे.
थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित राहाणं हा योग्य प्रकार आहे. डॉक्टरही पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला देतात.
Disclaimer - ही माहिती जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने देण्यात आलेली आहे. यासाठी सामान्य माहितीची मदत घेतली आहे. कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.