भारताच्या 56.4 टक्के लोकांना आहारात योग्य पदार्थांचा सामावेश नसल्यामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
आरोग्यदायी राहण्यासाठी दिवसभरात किमान 1200 ग्रॅम अन्न खाणे गरजेचे आहे.
जेवणात 100 ग्रॅम फळ, 400 ग्रॅम हिरव्या भाज्या, 300 मिली दूध किंवा दही, 85 ग्रॅम डाळ, 35 ग्रॅम बीया आणि 250 ग्रॅम अन्न असायला हवे.
दिवसभरच्या आहारात 70 ग्रॅम मांसाहारी पदार्थांचा सामावेश असायला पाहिजे.
तूपाऐवजी मोहरीचे तेल आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते.
कोणत्याही गंभीर आजारापासून वाचण्यासाठी जेवणाची एक ठराविक वेळ असायला हवी.
दररोज वेळेवर जेवल्याने पाचनक्रिया व्यवस्थित चालू राहण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)