साखरेचं अतिप्रमाणात सेवन आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं. त्यामुळे आपल्याला बऱ्याच गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
अतिप्रमाणात साखरेचं सेवन केल्याने डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, बॅड कॉलेस्ट्रॉल, हृदय रोग यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
आता प्रश्न हा पडतो की, एका दिवसात किती प्रमाणात खल्ली पाहिजे?
एका अहवालानुसार असं समोर आलंय की, साखर आपल्या शरीरात कॅलेरीज वाढवण्याचं काम करते.
सोप्या भाषेत एखाद्या पदार्थात साखर घालून त्याची चव वाढवली जाते. ज्यामुळे आपण तो पदार्थ जास्त खातो. जे आपल्या शरीरात कॅलेरीज वाढवून, आरोग्यासाठी धोकादायक ठरतं.
त्याचप्रमाणे आणखी एका अहवालात असं सांगितलय की, आपण ठराविक प्रमाणात साखरेचं सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यास कमी धोकादायक ठरतं.
आपण दिवसभरात जे काही सेवन करतो त्याचं कॅलेरी इंटेक 5 टक्क्यांपेक्षा जास्त नसलं पाहिजे.
दिवसभरात एका सुदृढ व्यक्तीने 30 ग्रॅम म्हणजेचं 7 चमचे इतकचं साखरेचं सेवन केलं पाहिजे.