सोशल मीडिया उघडल्यावर सर्वात वेड लावणारी गोष्ट म्हणजे रिल्स. अनेकजण तासनतास रिल्स बघत बसतात.
एका मिनिटात सामान्य माणूस कमीतकमी 30 रिल्स बघतो. जर असं केलं नाही तर आपण इतरांच्या तुलनेत मागं पडतोय, असा फोमो निर्माण होतो.
तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की जर तुम्ही तासाभराहून अधिक रिल्स बघत बसले तर अनेकांना थकवा जाणवतो आणि अस्वस्था वाटते.
त्याचं कारण तुमच्या मनावर होणारा मानसिक आघात... अनेक प्रकारच्या रिल्स पाहून तुमचं मन विचलित होतं. त्यामुळे शरिरातील हार्मोन्सवर याचा थेट परिणाम होतो.
मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी एकाग्र मन असणं गरजेचं आहे. मात्र, सध्याच्या धावपळीच्या युगात मानसिक त्रास सहन करावा लागतो.
मेडिटेशनमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. सध्या ऑनलाईन तरुणाईला ब्रेकअप आणि इतर मानसिक त्रासातून बाहेर येयचं असेल तर रिल्स बघणं बंद करून वास्तविक जगात लक्ष देणं गरजेचं आहे.