स्वस्त आणि मस्त! घरच्या घरीच असा बनवा मॅगीचा मसाला

लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मॅगी

Mansi kshirsagar
Jun 14,2023


पण मॅगी सतत खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं


म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घरच्या घरी मॅगी मसाल्याची रेसिपी घेऊन आलो आहोत

साहित्य

कांदा, लसूणची पावडर, कॉर्न फ्लोर, आमचूर पावडर, पीठीसाखर, चिली फ्लॅक्स, लसणाची पावडर, जिरे, हळद, काळी मिरी, बडिशोप, मेथी दाणा, तमालपत्र आणि मीठ,

कृती

जिरे, काळीमिरी, बडीशोप, मेथीचे दाणे, तमालपत्र, चिली फ्लेक्स उन्हात ठेवून सुकवून घ्या


तव्यावर हे सगळे मसाले भाजून घ्या. त्यानंतर मसाले थंड होण्यासाठी ठेवून द्या


मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या


वाटलेले मसाले चाळून घ्या आणि त्यात मीठ, हळद, आमचूर आणि आल्याची पावडर मिक्स करुन घ्या


त्यानंतर लसूण व कांद्याची पावडर मिसळून घ्या


तुमचा मॅगी मसाला तयार झाल्यानंतर एका एअरटाइट डब्यात बंद करुन ठेवा

VIEW ALL

Read Next Story