निद्रानाश हा असा आजार आहे ज्याचा त्रास अनेकांना होत असतो. हा आजार आपल्या आयुष्याचा एक भाग कधी बनतो हे आपल्याला कळत नाही.
प्रत्येकाला शांत झोप हवी असते. जर माणसाला योग्य झोप लागली तर सकाळी उठल्यानंतर त्याचा मूड फ्रेश राहतो. त्यासाठी प्रत्येकाने किमान 6 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे.
तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी तुम्ही कॅफिन असलेल्या गोष्टींपासून दूर रहा. झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी प्यायची सवय सोडून द्या.
झोपण्यापूर्वी पोटभर जेवू नये. झोपण्यापूर्वी हलके अन्न खाणं केव्हाही चांगलं असतं. रात्री पोट खराब झाले तर तुमची झोप उडून जाईल.
झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ सेवन करणे देखील चांगले नाही. तसेच रात्री झोपण्यापूर्वी अॅसिडिक पदार्थांचे सेवन टाळा.
रात्रीच्या वेळी आंबट रस, कच्चा कांदा, टोमॅटो केचप, पिझ्झा इत्यादी गोष्टींपासून लांब राहिल्यास तुम्हाला निवांत झोप येईल.