किसिंग हे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम आहे. पण याचे फायदे आणि किसिंग करताना घ्यायची काळजी जाणून घेऊया.
किसिंगमुळे तणावमुक्त राहण्यास मदत होते. यामुळे शरिरात ऑक्सीटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे हॅप्पी हार्मोन रिलीज होतात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, किसिंग दरम्यान लाळ तोंडात घोळल्याने इम्यून सिस्टिम मजबूत होते. ओरल हायजीनदेखील मेंटेन राहते.
सेक्सदरम्यान केलेल्या किसिंगमुळे सेक्श्युल सॅटिस्फॅक्शन मिळते. यामुळे लैंगिक आणि प्रेम संबंध मजबूत होतात.
किसिंगमुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. सिम्पल किसमुळे 2-3 तर पॅशनेट किसिंगमुळे 5 ते 26 कॅलरीज बर्न होतात.
किसिंग करताना सर्वात आधी परवानगी महत्वाची असते. आपल्या प्रिय व्यक्तीला विश्वासात घ्या. 'नो मिन्स नो' हेदेखील लक्षात ठेवा. अन्यथा तुम्ही चांगलं नातं गमावून बसाल.
किसिंग करताना डोकं एकमेकांना आपटणार नाही, याची काळजी घ्या.
किसिंग करताना डोळ्यात डोळे टाकून बघा. यामुळे प्रेम वाढते.
किसिंग करताना घाई करु नये, यामुळे नात्यावर नकारात्मक परिणाम पडतो.
किसिंग करताना ओरल हायजिनची काळजी घ्या. नियमित माऊथ वॉश, ब्रश्न केल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही.