टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांच्या जेवणातूनही आता टॉमेटो गायब झाले आहेत.
पेट्रोलच्या दरापेक्षाही एक किलो लाल भडक टोमॅटोची जास्त किंमत आहे.
सध्या टॉमेटोची चर्चा असतानाच आता काळे टोमॅटोही चर्चेत आले. काळ्या टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
काळ्या टोमॅटोची शेती सर्वात पहिले ब्रिटेनमध्ये करण्यात आली होती. रे ब्राइन यांनी हा प्रयोग केला होता. जेनेटिक म्युटेशनच्या माध्यमातून हा प्रयोग केला गेला.
काळ्या टोमॅटोमध्ये फ्री रेडिकल्ससोबत लढण्याची ताकद आहे. यामुळं कॅन्सरपासून बचाव होतो.
डोळ्यांसाठीसुद्धा काळे टोमॅटो फायदेशीर आहेत. शरीरातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीची गरज हे टोमॅटो पूर्ण करतात.
रोजच्या आहारात जर तुम्ही काळ्या टोमॅटोचे सावन करत असाल तर हृदयसंबंधी सर्व आजारांपासून मुक्ती मिळेल. यातील एंथोसाइनिनमुळं हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
या टोमॅटोमध्ये अँटी ऑक्सिडेंट, मिनरल्ससारखे मॅग्निशियम आणि पोटॅशियम घटक आढळले जातात. यामुळं रक्तप्रवाह सुरळीत राहतो व रक्तदाबासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
टोमॅटोमुळं लठ्ठपणा दूर होण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते व वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मधुमेहामुळं त्रस्त असलेल्या लोकांना या टोमॅटोचे सेवन करावे. पोषकतत्वांनी भरपूर असलेल्या या टोमॅटोमुळं शुगर लेव्हल नियंत्रणात येते.